जिल्हा

अगरबत्तीच्या २७ काड्यांवर कोरले संपूर्ण अथर्वशीर्ष !

अगरबत्तीच्या २७ काड्यांवर कोरले संपूर्ण अथर्वशीर्ष !
अगरबत्तीच्या २७ काड्यांवर कोरले संपूर्ण अथर्वशीर्ष ! फोटो: ठाणे वैभव

डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेमंत सुगंधी भंडारच्या माध्यमातून पूर्वेकडील रामनगर येथील बालभवन येथे यंदाही अगरबत्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या १३ व्या वर्षानिमित्त यंदा धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारी कलाकृती सादर करण्यात आली आहे. अगरबत्तीच्या तब्बल २७ काड्यांवर संपूर्ण अथर्वशीर्ष कोरण्यात आले असून ही सूक्ष्म कलाकृती लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.

गणेशोत्सवापूर्वी दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवात अगरबत्तीच्या विविध प्रकारांसोबतच वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या जातात. यंदाच्या महोत्सवातील २७ अगरबत्तीच्या काड्यांवर कोरण्यात आलेले अथर्वशीर्ष विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे अथर्वशीर्ष काड्यांवर लिहिण्यात आलेले नसून अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अक्षरशः कोरण्यात आले आहे. अत्यंत लहान आकारात अक्षरांची मांडणी करत ही कलाकृती साकारण्यात आल्याने ती पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता दिसून येत आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी अगरबत्तीशी संबंधित नवनवीन संकल्पना आणि कलाविष्कार सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या १३ वर्षांत ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाला आणि उत्पादनाच्या दर्जाला महत्त्व देत त्यानुसार नवनवीन प्रयोग केले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. यंदा २७ अगरबत्तीच्या काड्यांवर साकारलेले अथर्वशीर्ष हे या प्रयोगाचे वेगळेपण ठरले आहे. धार्मिक श्रद्धा, कलात्मकता आणि आधुनिक लेझर तंत्रज्ञान यांचा संगम असलेली ही सूक्ष्म कलाकृती डोंबिवलीतील अगरबत्ती महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475